अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी मिळाला डिस्चार्ज; एकदम नवाबी अंदाजात तो पोहोचला घरी, सैफची सेक्युरीटी वाढवली
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी जीवघेणा हल्ला झाला. मंगळवारी सैफला डिस्चार्ज मिळाला. तो लीलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्याची पहिली झलक समोर आली. पाठीवर चाकूचे सहा वार झेलून तो एकदम ठणठणीत असल्याचं दिसला.एकदम नवाबी अंदाजात तो घरी पोहोचला. सैफ अली खान ची डिस्चार्जनंतर पहिली झलक व त्याचा स्वॅग सर्वांचं लक्ष वेधून घेतला.सैफला मंगळवारी डिस्चार्ज मिळाला. तो घरी परतला असून हल्ल्यानंतर त्याची पहिलीज झलक समोर आली. त्याने एकदम चष्मा लावून नवाबासारखी एन्ट्री घेतली. १६ जानेवारी रोजी सैफ अली खानच्या घरात घुसखोरी झाल्यानंतर आता मोठे पाऊल उचलले गेले आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सैफ अली खान सद्गुरू शरण नावाच्या इमारतीच्या ७व्या मजल्यावर राहतो. त्यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. तसेच घराच्या खिडक्यांना ग्रिल्स बसवल्या जात आहेत. याशिवाय करीना कपूर खानच्या बॉडीगार्ड्ससोबत मुंबई पोलीस इमारतीच्या बाहेर तैनात आहेत. इमारतीच्या बाहेर बॅरिकेड्सही लावले जात आहेत.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली आहे. हल्लेखोराचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असून तो बांगलादेशचा रहिवासी आहे. सध्या शरीफुल पोलिस कोठडीत आहे आणि त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत आरोपीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. शरीफुल भारतात ओळखपत्र तयार करण्यासाठी चोरी करण्याचा विचार करत होता. मात्र नंतर त्याने आपला विचार बदलला. आरोपीने असेही सांगितले की, चोरी करून मोठी रक्कम मिळाल्यास तो बांगलादेशला परत जाण्याचा विचार करत होता. तो चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात शिरला होता. प्राथमिक तपासणीत असे समोर आले की, शरीफुलने सातव्या मजल्यापर्यंत जिन्याचा वापर केला. याच मजल्यावर सैफ आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्यानंतर तो डक्ट एरियातून १२व्या मजल्यावर गेला आणि बाथरूमच्या खिडकीतून सैफच्या फ्लॅटमध्ये शिरला. जसा तो बाथरूममधून बाहेर आला, सैफच्या महिला स्टाफने त्याला पकडले. महिला स्टाफच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ आणि करीना बाहेर आले. सैफ आणि आरोपीमध्ये झटापट झाली. याच दरम्यान, आरोपीने सैफवर चाकूने वार केले. सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर ६ तास चाललेल्या दोन शस्त्रक्रिया पार पडल्या.