दिशा महिला मंच आणि कामोठे पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी – पालकांचे प्रबोधन
रवि निषाद/मुंबई
मुंबई – दिशा महिला मंच आणि कामोठे पोलिस यांच्या संयुक्त आयोजनाने नवी मुंबई जिल्हा स्तर व कामोठे परिसरातील विद्यार्थी तसेच पालक यांचे प्रबोधन करण्यासाठी १ जानेवारी २०२४ पासून दिशा व्यासपीठ कामोठे व कामोठे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा तसेच समाजातील विविध संस्था या ठिकाणी कार्यक्रम करून समाजात प्रबोधन करण्याचे कार्य करण्यात आले.
दिशा महिला मंचची अध्यक्षा नीलमताई आंधले यांनी सांगितले की, सदर कार्यात कामोठे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच समाजातील वकील व जाणकार प्रतिष्ठित यांच्या मार्फतने लेक्चर व त्यांचे अनुभव या माध्यमातून सध्याची भावी पिढी यांना मार्गदर्शन केले. यामध्ये मोबाईलच्या विळख्यात अडकलेला विदयार्थीवर्ग, सायबर क्राईम” सायबर फ्रॉड, व्हाट्सअप फेसबुक द्वारे होणारे रोड व त्यामध्ये बरबाद होणारी तरुण पिढी मुलींवरील अत्याचार व घ्यावयाची खबरदारी, यामध्ये शाळेतील मुलींना गुड टच व बॅड टच बाबत दिलेली माहिती.
अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे अभियान इत्यादी विविध विषयाद्वारे कामोठे येथे राबवत आहेत. दिशा सामाजिक संस्था व कामोठे पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने वर्षाच्या पहिल्या दिवसा पासून हे अभियान शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवत आहेत.आतापर्यंत जवळपास चौदा शाळांमध्ये अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, सहा हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडियाच्या वापराविषयी जागरूकता,/मोबाइलचा सकारात्मक व नकारात्मक वापर व त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम व प्रभाव,ऑनलाईन फसवणूक सायबर सुरक्षा,सायबर गुन्हा व प्रकार, मानसिक आरोग्य जागरूकता अभियान,मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या मार्गदर्शक सूचना तसेच शारीरिक बदलामुळे होणारे परिणाम,आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती तसेच सोशल मीडिया च्या गैरवापरामुळे सायबर गुन्हेगारी किंवा सायबर जागरूकता या विद्यार्थामध्ये कशी पसरवली जाऊ शकते, याबाबत विविध उदाहरणे देऊन जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते आगामी भविष्यात एक चांगले आणि जबाबदार नागरिक बनू शकतील यावर सेशन घेण्यात आले. सकारात्मक प्रतिसादात एकंदरीत हे अभियान अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाले. यावेळी कामोठे पोलीस स्टेशन मधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे विमल बिडवे मॅडम, कागणे पोलीस उपनिरीक्षक, कामोठे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद मसलकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका खरटमल, दिगंबर होडगे सर तसेच युवा व्याख्याते ऍड विवेक भोपी व डॉ.कल्याणी पात्रा, युवा व्याख्याते सुजित काळंगे, शैलेश कोंडसकर,
पी.एल.व्ही.पनवेल जिल्हा न्यायालय, ऍड सिद्धार्थ इंगळे, लेखक पंकज सूर्यवंशी, ऍड विकी दुशिंग, सिए कुमार बोडके, ऍड जय पावणेकर, नाना पडाळकर, किरण शिंदे या वक्त्यांनी तसेच दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे व उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी मार्गदर्शन केले.विदयार्थ्यांचे भविष्यात होणारे नुकसान, विद्यार्थी वर्ग नशेमध्ये गुंतत चालला आहे त्याचे परिणाम काय होतात व ते कसे टाळता येईल त्याबाबत नेमकी काय खबरदारी घ्यावी याच्या टिप्स देखील या अभियानात देण्यात आल्या, याशिवाय विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना देखील उत्तर देण्यात आली. यापुढेही शाळा,कॉलेज,सामाजिक संस्था तसेच गृहनिर्माण सोसायटीमध्ये देखील अशा कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. सौ.निलमताई आंधले आणि त्यांचा सहयोगी विदयाताई मोहिते यानी वरील कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली. श्रीमती आंधले यानी कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व मान्यवारांचा आभार मानले आहे.