काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आल्याने प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याची काँग्रेसकडून दखल घेण्यात आली आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार मानावी लागली. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून याची दखल घेण्यात आली असून त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती आहे.