ठाण्यात मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, चितळसर मानपाडा पोलिसांची कारवाई

Spread the love

ठाण्यात मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, चितळसर मानपाडा पोलिसांची कारवाई

मोटार सायकल चोरीचे एकूण ०४ गुन्हे उघडकीस 

रवि निषाद/प्रतिनिधि

ठाणे – चितळसर मानपाडा पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणान्या दोन सराईत गुन्हेगाराना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटार सायकल चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणण्यात चितळसर मानपाडा पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.क्र.१०/२०२५ भा.द.वि.३७९ प्रमाणे एका गुन्हे नोंद करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कृष्णा नायडु (१९) वर्ष रा.ठी.अलवट पार्किंग जवळ, टायगर सोसायटी जवळ, उल्हासनगर – ४ आणि दुसरा आरोपी रितीक शरद बाविस्कर (१९) वर्ष रा.ठी, द्रोपदी निवास, गणेश नगर,ओटी सेक्शन उल्हासनगर ४ आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार तांत्रिक आणि मानवी तपास करुन पोलिसांनी दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कडून ३००००/-रुपये किमतीची होंडा अक्टिवा क्र.MH०५.BN.७४७०,

१२००००/-रुपये किंमतीची यमहा सुझुकी कंपनीची जिक्सर क्र.एमएच.०५.एफसी.५८४७,४००००/-रूपये किंमतीची सुझुकी कंपनीची एक्सेस स्कूटर क्रं.एमएच.०५.ईएफ.३७७०,आणि ८०,०००/-रुपये किंमतीची बजाज कंपनीची पल्सर क्रं एमएच.४६- सीएन.५५४२ एकूण २,७०,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि संपत फडोळ व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon