नवी मुंबईतील डिमार्ट परिसरात पाच ते सहा राउंड फायर; एक जण जखमी; नागरीकांमध्ये घबराट
योगेश पांडे/वार्ताहर
नवी मुंबई – सध्या राज्यभरातून गोळीबाराच्या अनेक घटना कानावर येत आहेत. अशातच शुक्रवारी सकाळच्या वेळेत नवी मुंबईतील सानपाडा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथील डी मार्ट परिसरात हा गोळीबार झाला. दोन दुचारीस्वारांनी पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाले आहेत. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.नवी मुंबईच्या डी मार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकणानंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईत एक मोठी गुन्ह्याची घटना उघडकीस आली आहे. तर सानपाडा परिसरात गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी डी मार्ट परिसरात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या व्यक्तीने पळ काढला.
आरोपींनी पाच ते सहा राऊंड फायर केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे. ही व्यक्ती कोण होती, गोळीबार का केला, त्याच्याकडे पिस्तूल कुठून आले याचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केला आहे. दोन आरोपींनी गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.