घाटकोपर रस्ते घोटाळ्यात मुंबई मनपाचे काही भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डर अडकणार !
मनपाच्या रस्त्यावर बेकायदा इमारत बांधून मॅन रियल्टर विकासकाकडून १००० कोटींची कमाई
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – घाटकोपर पूर्वेकडील महानगर पालिका एन विभागाच्या हद्दीत असलेल्या नायडू कॉलनीमध्ये मॅन रियल्टर अँड होल्डिंग प्रा.लि.यानी आरक्षित असलेल्या रस्त्याच्या १९४०.७६ चौरस मीटर जागेवर खाजगी इमारत बांधली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी त्यांच्या वकिलामार्फत सर्व संबंधित विभागांकडे तक्रार केली आहे.
घाटकोपरमध्ये झालेल्या या रस्ते घोटाळ्यात काही मोठे मासे सहभागी आहेत आणि त्यात एका नामवंत विकासक व काही मनपाचे अधिकारी अडकणार आहेत अशी चर्चा जोरात सुरू आहे तसेच या अनधिकृत इमारतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मॅन रियल्टर एंड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने नायडू कॉलनीतील १५९ ते १७२ इमारतींची सोसायटी पाडून सदर इमारत पुनर्विकासाअंतर्गत एक मोठे कॉम्प्लेक्स बांधले आहे, ज्यामध्ये सुमारे १४ इमारतींचा समावेश आहे. ज्या रस्त्यावर त्यांनी अनधिकृत जागा ताब्यात घेतली आहे तो ६० फुटाचा मोठा रस्ता होता ज्याचे एकूण क्षेत्रफळ १९४०.७६ चौरस मीटर आहे आणि त्या भूखंडावर बेकायदेशीर इमारत बांधून विकासकाने जवळपास १००० कोटी रुपयांचा नफा कमावला असल्याचे बोलले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात मनपाचे काही वरिष्ठ अधिकारी आणि विकासक अडकले आहेत. अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी पोलिस महानगरच्या प्रतिनिधीसी बोलताना सांगितले की, आम्हाला त्या रस्त्याचा डीपी प्लॅन महानगर पालिका विभागाकडून मिळाला असून तिथे आजही रस्त्याच्या स्वरुपात दिसत आहे, पण मन रिअल्टरने तो रस्ता गायब केला आणि तिथे एक आलिशान इमारत सध्या उभी राहिली आहे. या प्रकरणात काही मोठया माशांचा सहभाग असून त्यांचावर कारवाई होणार की नाही असा सवाल ही येथील नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाबाबत जेष्ठ अधिवक्ता नितीन धनडोरे यांच्या मार्फत सर्व संबंधित विभागांना लेखी तक्रार देऊन मन रियल्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी अब्दुल रज़्ज़ाक मुल्लानी केली आहे. मुल्ला यानी पुढे सांगितले की, जोपर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व संबंधित अधिकारी आणि मन रियल्टरच्या ऑपरेटर वर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही याप्रकरणी लढा देत राहू आणि काही दिवसांनी आम्ही उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्याची तयारीही केली आहे. या अनधिकृत इमारतीच्या भागीदारीत एका मोठया नेत्याचा सहभाग असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे.
पुढील अंकात पर्दाफाश….