आमचा संयम संपलाय, एका एका मारून येऊ; संतोष देशमुखांच्या पत्नीचा उद्वेग
केंद्रीय मंत्री रामदास आठवले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला
योगेश पांडे/वार्ताहर
बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २२ दिवस झाले असून अद्याप या प्रकरणाचे मास्टरमाईंड अद्याप फरार आहेत. संतोष देशमुखला न्याय द्या या मागणीसाठी कुटुंबातील सदस्य मुक मोर्चात देखील सहभागी झाली आहेत. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोग या गावी गेले. त्यांनी कुटुंबाचे सात्वन केले आणि त्यांना धीर दिला. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि आईला अश्रू अनावर झाले. संतोष देशमुखांची पत्नी म्हणाली, काय वेदना होत आहेत ते आमच्या जीवाला माहिती आहे.का इतका वेळ लागतोय? आता आमचा संयम संपत चालला आहे. आता अक्षरश: मला तर वाटतय की मी जाऊन एका एका मारून येऊ..आता मला वेदना असह्य होत आहे.
संतोष देशमुखांची आई म्हणाली, माझ्या लेकराचा त्या दिवशी उपवास होता. मी स्वत:च्या हाताने लेकरासाठी स्वयंपाक केला होता. जेवायला येण्यासाठी मी स्वयंपाक केला होता. माझ्या लेकरासारखा देवमाणूस कुठेच भेटणार नाही. देव एखाद्या वेळेला हयगय करेल पण माझ्या माणसाने कधीच हयगय केली नाही. मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मागण्या घेऊन आज सकल मराठा समाजाकडून सिंदखेड राजा शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मोर्चा ॉमध्ये संतोष देशमुखांची मुलगी आणि बहीण सहभागी झाले.