ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन, सोमवारी अंत्ययात्रा
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान ८४ यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. सतीश प्रधान यांचा जन्म २९ ऑगस्ट १९४० रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे पहिले महापौर होते. ते शिवसेनेचे होते आणि राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते. काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उचचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची १९८० साली स्थापन केले होती. माजी खासदार, ठाण्याचे पाहिले नगराध्यक्ष, पाहिले महापौर राहिले आहेत. ठाणे शहरात पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती.त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. काही दिवसांपूर्वी सतीश प्रधान यांची रुग्णालयामध्ये जाऊन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली होती.