गुजरात मधील चोराला वसई पोलीसांनी ठोकल्या बेड्या; १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

गुजरात मधील चोराला वसई पोलीसांनी ठोकल्या बेड्या; १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

वसई – वसई विरार शहरात गुजरात राज्यातील सोनसाखळी चोर सक्रीय झाले आहेत. मागील महिन्यात एकाच दिवसात दोन सोनसाखळी चोरीच्या घटनांचा छडा वालीव आणि माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने लावला असून गुजरातमधील कुख्यात चोर कन्नुभाई उर्फ कन्हैय्या सोलंकी याला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी वसईत एकाच दिवसात दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे प्रज्ञा वाडिया (५३) या महिलेच्या गळ्यातून दुचकावीरून जाणार्‍या दोन तरूणांनी त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. काही अंतरावरच असलेल्या गोखिवरे तलाव रोड येथे दुसरी घटना घडली. उर्मिला वापीवाला (७०) या गॅलेक्सी अपार्टमेंट समोरून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ जाऊन मोटारसायकल थांबवली आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना त्या पत्ता सांगत असताना दोघांना त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याच्या धातूची साखळी खेचून पळ काढला. या प्रकरणी वालीव आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुजरातमधील कुप्रसिध्द कन्नुभाई उर्फ कन्हैय्या सोलंकी – ४५ याला गुजराथच्या हिंमतनगर येथे पाठलाग करून अटक केली. त्याला मदत करणारे त्याचे दोन साथीदार मोहम्मद शरीफ खान (५४) याला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला १ लाख ९० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

कन्नुभाई उर्फ कन्हैय्या सोलंकी हा गुजरातमधील कुख्यात चोर असून त्याची टोळी आहे. त्याच्याविरोधात अहमदाबा, साबरकाठा, सुरत आदी विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात ७ गुन्ह्यांची नोंद आहे. तर त्याचा साथीदार मोहम्मद खान याच्यावर वांद्रे आणि गुजरातमधील उमरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले- श्रींगी यांनी दिली. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon