रत्नागिरीत वायू गळती, ३० हून अधिक विद्यार्थ्यांना श्वसनासह उलट्यांचा त्रास
योगेश पांडे/वार्ताहर
रत्नागिरी – रत्नागिरीच्या जयगडमधील जिंदाल कंपनीतून वायू गळती झाल्याची दुर्घटना घडली आहे. वायू गळतीमुळे जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा मोठा त्रास झाला आहे. वायू गळतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायू गळतीमुळे ३०-४० विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला.विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिंदाल कंपनीच्या टाक्यांचे काम सुरु असताना वायू गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. इथाईल स्वरूपाचा हा वायू असलायचे कळतंय. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन मुलींना अतिदक्षता विभागात नेण्यात आले आहे. जेव्ह वायू गळतीची घटना घडली, तेव्हा शाळेमध्ये जवळपास २०० हून अधिक मुले होती. विद्यार्थांना त्रास होण्यास सुरुवात होताच मुलांचे पालक मिळेल त्या गाडीने रुग्णालयात धाव घेतले.