गुजरातचे ‘मुन्नाभाई, ७० हजारांत मेडिकलची डिग्री, दवाखानेही उघडले; पोलिसांकडून १४ जणांना अटक 

Spread the love

गुजरातचे ‘मुन्नाभाई, ७० हजारांत मेडिकलची डिग्री, दवाखानेही उघडले; पोलिसांकडून १४ जणांना अटक 

योगेश पांडे/वार्ताहर 

सूरत – गुजरातमधील सुरतमध्ये बनावट ‘बॅचलर ऑफ इलेक्ट्रो-होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी’ (बीईएमएस) पदवी घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी १० बनावट डॉक्टरांसह १४ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या दवाखान्यातून ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीची औषधे, इंजेक्शन्स, सिरपच्या बाटल्या आणि प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले की ‘तीन आरोपी बनावटबीईएमएस डिग्री ७० हजार रुपयांना विकत होते. सुरतचा रहिवासी रेशेश गुजराती, अहमदाबादचा रहिवासी बीके रावत आणि त्यांचा सहकारी इरफान सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. गुजराती आणि रावत ‘बोर्ड ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन, अहमदाबाद’च्या नावाखाली ही टोळी चालवत असल्याचे आमच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

डॉक्टर पदवी असलेले तीन लोक स्वतःची ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत आहेत. महसूल विभागाने पोलिसांसह त्यांच्या दवाखान्यांवर छापे टाकले. त्यावेळी आरोपींना दाखवलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. आरोपी बनावट वेबसाइटवर ‘डिग्री’ची नोंदणी करत होते, असं पोलीस तपासात समोर आलं. मुख्य आरोपीला जेव्हा कळले की भारतात इलेक्ट्रो-होमिओपॅथीचे कोणतेही नियम नाहीत, तेव्हा त्याने या अभ्यासक्रमासाठी पदवी प्रदान करण्यासाठी बोर्ड स्थापन करण्याची योजना आखली. पोलिसांनी सांगितले की त्याने पाच लोकांना कामावर घेतले आणि त्यांना इलेक्ट्रो-होमिओपॅथीचे प्रशिक्षण दिले आणि त्यांनी तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत हा अभ्यासक्रम पूर्ण केला. पोलिसांनी सांगितले की त्यांनी पदवीसाठी ७०, ००० रुपये शुल्क आकारले आणि प्रशिक्षण दिले. या प्रमाणपत्रामुळे ते कोणत्याही समस्येशिवाय ॲलोपॅथी, होमिओपॅथी मेडिकल प्रॅक्टिस करत होते. प्रमाणपत्रांच्या वैधतेचा कालावधीही नमूद करण्यात आला असून डॉक्टरांना ५००० ते १५, ००० रुपये भरून वर्षभरानंतर त्यांचे नूतनीकरण करावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांना आरोपींन अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon