प्युमा कंपनीचा लोगो वापरून बनावट मालाची विक्री करणा-या शॉपमधुन ८,०२,६००/- रू. कि. चा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर यांची कामगिरी
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे शहरात एका नामांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या घटना सातत्याने घडत असून, पुन्हा एकदा कात्रज भागात कारवाई करून पोलिसांनी नामांकित कंपनीचा लोगो असलेले बॅग, शूज अन् कपडे विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विक्रेता शिवम बाबूलाल गुप्ता (वय २४, रा. निपानी वस्ती, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर याबाबत पोलिसांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
‘प्यूमा’ कंपनीचा लोगो वापरून विकल्या जाणार्या बॅगा, शूज आणि कपड्यांचा यामध्ये समावेश आहे. शहरात नामांकित कंपनीच्या वस्तू बनावट पद्धतीने तयार करून त्या विक्री केल्या जात असल्याचे वारंवार दिसत आहे. प्यूमा या नामांकित कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट बॅगा, टि शर्ट, स्पोर्टस शूज, जॅकेट, कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानूसार युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह पथकाने कात्रज भागातील स्टायलॉक्स फॅशन हब या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानात पॅन्ट, शर्टसह इतर वस्तूंवर प्यूमा या कंपनीचे बनावट टॅग लावून विक्री होत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने येथून ८ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने हा माल कोठून आणला, याबाबत तपास करण्यात येत आहे.
प्युमा या ब्रँडेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट असा मुददेमाल जप्त केला असून असून शॉप मालक याचेवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक १०१८ / २०२४ कॉपीराईट ऍक्ट १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात नागनाथ राख या पथकाने केली.