छेडानगरच्या नागरिकांची ६ महिन्यांपासून भटकंती, प्रशासन ठिम्म व मौनी

Spread the love

छेडानगरच्या नागरिकांची ६ महिन्यांपासून भटकंती, प्रशासन ठिम्म व मौनी

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – छेड़ानगरमधील ४०० हुन अधिक मध्यमवर्गीय नागरिकांची घरे गेल्या ६ महिन्यांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आली होती ती आजतागायत तशीच आहेत. या बेघर झोपडीधारकांचे कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न पीडित नागरिकांना सतावत आहे. सदर झोपडपट्टी धारकांना २४ जून २०२४ रोजी बेघर करण्यात आले होते. अतिवृष्टीच्या महिन्यामध्ये गोरगरिबांना बेघर करण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यानी केला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सावित्रीबाई फुले वेल्फेअर असोसिएशन चेंबूर विधानसभा मतदार संघ, छेडानगर महामार्ग, घाटकोपर लिंक रोड, जय अंबे नगर समोरील राहत असलेल्या सर्व झोपडपट्टी धारकांकडे आवश्यक शासकीय कागदपत्रे व मतदार यादीत नावे, शिधापत्रिका असूनही १९९५ पासून सुमारे ४०० कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. स्थानिक रहिवासी मोहम्मद रिजवान शेख म्हणाले की, ही बांधकामे बेकायदेशीर असल्याचे सांगून सरकारी अधिकाऱ्यांनी आमची घरे पाडली आहेत. त्यांना अपात्र ठरवून घरे उद्ध्वस्त केली आहेत, मग त्यांचा निवडणूकीत मतं कशाला हवीत असा मुद्दाही त्यांनी मांडला. लोकांचा मुलभूत हक्क आहे, मग ती घरे का उद्ध्वस्त केली गेली, यासाठी आवश्यक असलेला लढा स्थानिक समाजसेवक सावित्रीबाई फुले वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद रिजवान शेख आणि रिपब्लिकन झोपडा असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठलराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. येथील झोपडपट्टी धारक मागील ६ महिन्यांपासून मुंबईतील आजाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांची मागणी आहे की, जो पर्यन्त शासन, प्रशासन त्याना न्याय देत नाही तो पर्यन्त त्यांचे उपोषण शुरूच राहील. मोहम्मद रिजवान यानी असेही सांगतले की, येथील पोलिस आमच्या सर्व लोकांना अमानुषपणे वागणूक देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon