नाशिक शहरात सलग दुसर्‍या दिवशी लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; एका संशयिताला अटक

Spread the love

नाशिक शहरात सलग दुसर्‍या दिवशी लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; एका संशयिताला अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसर्‍या दिवशी आगरटाकळी भागातील वैद्यवाडीमध्ये पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ७२ हजार २८० रुपये किंमतीचा दडवून ठेवलेला अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित दातार लोखंडे यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मागील ४८ तासांत उपनगर पोलिसांकडून अवैध मद्यसाठ्याविरोधी दुसरी मोठी कारवाई आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अवैध धंद्यांविरोधी कारवाईला गती देण्यात आली आहे. मतदानास चार दिवस शिल्लक असल्याने पोलीस यंत्रणा अधिकाधिक सतर्क झाली आहे. बुधवारी उपनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संशयित माजी नगरसेवक अशोक सातभाई यांच्या गाळ्यातून दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या सुमारे ९८ खोक्यांचा मद्यसाठा हस्तगत केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच उपनगर पोलीस ठाण्यातील अंमलदार पंकज कर्पे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे परिमंडळ- दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजय फुलपगारे आदींच्या पथकाने वैद्यवाडी येथील संशयास्पद घराची झडती वॉरंटद्वारे केली. त्यावेळी घरात मद्यसाठा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मद्यसाठ्याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे आढळून आला नाही किंवा त्यांना त्याबाबतची माहिती देता आली नाही म्हणून पोलिसांनी लोखंडे याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात राज्य दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon