भिवंडी पूर्वमध्ये सपाला मोठा धक्का; यादव समाज बाजूला झाल्याने रईस शेख यांच्या अडचणीत वाढ

Spread the love

भिवंडी पूर्वमध्ये सपाला मोठा धक्का; यादव समाज बाजूला झाल्याने रईस शेख यांच्या अडचणीत वाढ

योगेश पांडे/वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे समीकरण यावेळी अतिशय रंजक वळणावर आले आहे. निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तस तसा सपा उमेदवार रईस कासम शेख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी त्यांच्यापासून आधीच अंतर राखले होते. आता यादव समाजानेही त्यांना सोडून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संतोष शेट्टी यांचे सारथी बनले आहे. या बदलाकडे भिवंडीच्या राजकारणात भूकंप झाल्यासारखे पाहिले जात आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात ३ लाख ७० हजारांहून अधिक मतदार असून त्यात सुमारे ५३ टक्के मुस्लिम आणि ४७ टक्के हिंदू मतदारांचा समावेश आहे. यापैकी कामतघर, फेणा पाडा, पद्मानगर, श्रीरंग नगर, मानसरोवर, भादवड, टेमघर, नागाव आदी हिंदूबहुल भागात यादव समाजाचा प्रभाव दिसून येतो. उत्तर भारतातील समाजवादी पार्टीचे नेतृत्व यादव करीत असल्याने भिवंडीतील यादव समाज वर्षानुवर्षे सपाची मजबूत व्होट बँक मानली जात होती. या यादव समाजाने यावेळी आपली भूमिका बदलली आहे. यादव समाजाचे भिवंडी शहराध्यक्ष डॉ. एन. एल. यादव यांनी शिंदे गटातील संतोष शेट्टी यांना पाठिंबा दिल्याने रईस शेख यांची चिंता वाढली आहे.

भिवंडीत भाजप उत्तर भारतीय आघाडीचे शहराध्यक्ष मंगेश यादव आणि प्रसिद्धी प्रमुख पी. डी. यादव हे समाजाच्या या एकजुटीत यादव यांचे नेतृत्वही महत्त्वाची भूमिका बजावत असून, यावेळी ते आपल्या राजकीय ताकदीचा अधिक चांगला वापर करून त्यांनी शेट्टींना पाठिंबा दिला आहे. सपाला हादरा देत शेट्टींच्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या यादव समाजाने भिवंडीच्या राजकारणात नवे वळण आणले आहे. एकीकडे रईस शेख यांची पारंपरिक व्होट बँक डळमळीत झाली असताना, दुसरीकडे संतोष शेट्टी नेतृत्व आता बळकट होताना दिसत आहे. या जागेच्या बदलत्या निवडणूक समीकरणावरून यावेळी यादव समाज आपल्या निर्णयात स्पष्ट असल्याचे दिसून येते. याचा परिणाम केवळ सपाच्या मतांवर होणार नाही तर शेट्टींनाही भक्कम पाठिंबा मिळू शकतो. निवडणुकीच्या दंगलीत यादव समाजाच्या या भूमिकेने भिवंडीच्या राजकारणात नवीनच खळबळ उडाली आहे. ज्याचा निवडणूक निकालावर खोलवर परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon