बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो म्हणत २४ लाख रुपयांची फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो म्हणत २४ लाख रुपयांची फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

बीड – विज्ञान युगात पैशांचा पाऊस अशक्य असतानादेखील नागरिक आमिषाला बळी पडून आपली फसवणूक करून घेत आहेत. राज्यात सध्या विविध मार्गाने फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बीड जिल्ह्यात तांत्रिक विद्येच्या आधारे पैशांचा पाऊस पाडत तुम्हाला ७० करोड रूपये देतो म्हणत एकाची २४ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ६ जणाविरोधात जादूटोणा कायदा प्रतिबंधक कायदांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नगर रोड भागातील रहिवासी शेख अझहर शेख जाफर यांना आरोपी हामीद खान उर्फ बाबू करीम, जीलाने अब्दुल कादर सय्यद, सविता पवार, शेख समौर शेख अहेमद, उत्तम भागवत, प्रकाश गोरे हे विविध ठिकाणचे रहिवाशी असुन यांनी फिर्यादी शेख अझहर शेख जाफर यांना तांत्रिक विद्या अवगत असल्याचे सांगत तब्बल ७० करोड रूपयांचा पैशांचा पाऊस पाडुन देतो म्हणत तब्बल २४ लाख रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ४२०, १२०ब, ५०६ भांदवी सह कलम ३ नुसार नोंद करण्यात आला आहे. पैशांच्या लोभापाई विज्ञान युगातही पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाला बळी पडत २४ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलीस तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon