दरवाजातून प्रवेश करून किमती ऐवज चोरी करणाऱ्या महिलेस अटक
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मुंबईतील विनोवा भावे नगर पोलिसांचा हद्दीत एक ३० वर्षीय सराईत महिला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.त्या अटक केलील्या महिलेचे नाव पायल अजय पवार आहे.
मिळाली माहितीनुसार १५ ऑक्टोबर रोजी एका महिलेने विनोवा भावे नगर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद केली की, तिच्या घरात चोरी झाली आहे.ए चडीआईएल बिल्डिंग नंबर १७ रूम नंबर ५०७ मध्ये राहणाऱ्या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सदर प्रकरणी गु.र.क्र. ३७३/२०२४, कलम ३०५ भा.न्या.सं अंतर्गत गुन्हा नोद केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.रविंद्र क्षीरसागर यानी दिलेली माहितीनुसार यातील नमूद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी यांची सहकारी हे सकाळी कामावर गेले असता त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. फिर्यादी व त्याचे इतर सहकारी झोपले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे तीन मोबाइल हे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून चोरून नेले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याच्या घटना स्थळाला तात्काळ भेट दिली असता पोलिस शिपाही किरण पाटील व खेमू राठोड यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक महिला ही घटनास्थळावर संशयितरित्या दिसून आली. पोलिसांनी नमूद घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून व चोरी गेलेल्या मोबाइल फोन नंबरचे तांत्रिक तपास केला असता चोरीस गेलेल्या तीन पैकी एका मोबाइल नंबर हा बांद्रा येथे शेवटचे लोकेशन मिळाले, लागलीच पोलिस शिपाही अमर पाटील व रामदास निळे यांना प्राप्त लोकेशनच्या ठिकाणी पाठवले असता नमूद गुन्ह्यातील व सीसीटीवी फुटेज मधील संशयित महिला मिळून आली नाही. पोलिस अंमलदार अमर पाटील व निळे आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित महिला ही दिसून आली. लागलीच दोन पंचा समक्ष पंचनामांतर्गत वर सदर गुन्ह्यातील तिन्ही मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी महिलेस पुढील तपास कामी पोलीस ठाण्यास आणून महिला अधिकारी यांच्या समक्ष तपास केला असता सदर महिलेने दादर, कुर्ला,रबाळे,नवी मुंबई येथे अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तरी सदर गुन्ह्यातील महिलेस माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शन तत्त्वाचे पालन करून अटक करण्यात आली आहे.
पूर्वअभिलेख तपासत आहोत अशी माहिती पोलिसांनी सांगतली .सदर कारवाईत पोलिस पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनवणे, चेडे, पो.शि.पाटील,
पो.शि.राठोड, पो.शि. काळे,
पो.शि. पाटील शामिल होते.