अंधेरीच्या लोखंडवाला काम्प्लेक्स मधील रिया पॅलेस इमारतीत भीषण आग, तिघांचा दुर्दैवी मृत्यू; आग विझवण्यात यश
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील रिया पॅलेस या इमारतीमधील १० व्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. आगीची वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर बऱ्याच वेळानंतर आग विझवण्याचत फायर ब्रिगेडच्या जवानांना यश मिळाले. मात्र या आगीत दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला कॉम्प्लेक्स , क्रॉस रोड नंबर ४ जवळ रिया पॅलेस नावाची १४ मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी या इमारतीच्या १० व्या मजल्यावरील एका रहिवासी फ्लॅटला सकाळी ८ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. साधारण ९ च्या सुमारा अथक प्रयत्नांती आग विझवण्यात आली. मात्र त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. चंद्रप्रकाश सोनी (७४), कांता सोनी (७४) आणि पेलूबेटा (४२) असे मृतांचे नाव आहेत.