स्वतःच्या कार्यालयात चोरी करण्याच्या आरोपात निलंबित असणारा “चोर अधिकारी”
डॉ.सुनील मोरे यांना आखेर सहाय्यक आयुक्त, घनकचरा पदी बसवलाच
रवि निषाद/प्रतिनिधि
ठाणे – गेल्या ४ वर्षांपूर्वी स्वतः च्या कार्यालयामध्ये फाईल, संगणक चोरी केल्याप्रकरणी डॉ.सुनील मोरे यांच्यावर ठाणे पोलिसांतर्फे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीप्रकरणी ठाणे न्यायालयात खटला सुरू आहे आणि सुनील मोरे हे जामिनावर बाहेर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मनपामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयात चोरीच्या आरोपात निलंबित झाला होता. असा चोर अधिकारी डॉ.सुनील मोरेला अखेर सहायक मनपा आयुक्त घनकचारा विभागात नियुक्त करण्यात आले आहे. आता ठाण्याची घान पण चोरी होणार आहे का असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांतर्फे दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये हे स्पष्ट होत आहे के सुनील मोरे यांनीच ही चोरी केली होती. या प्रकरणाबद्दल एका ठाणेकरातर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका २९४७६/२०२४ दाखल झाली असून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी राजकीय दबावाखाली या “चोर” माणसाची परत नियुक्ती करण्यात आली आहे. हा खरोखरच निंदनीय प्रकार आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी ताबडतोप ही नियुक्ती रद्द करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात त्यांनाच जाब विचारला जाईल.अशी मागणी जेष्ठ समाजसेवक डॉ.वीनू वर्गीस आणि योगेश भाई यानी केली आहे.