मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या रुममध्ये गे तरुणांचे शारीरिक संबंध, दोघांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी दोघांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – दोन पुरुषांच्या समलिंगी संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. २२ वर्षीय तरुण आणि त्याच्या जोडीदाराचे शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आरोपींनी एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर केले होते. या प्रकरणी दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण मुंबईतील एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात काम करतो. त्याचा समलिंगी जोडीदार आणि सहकारी त्यांना ज्वेलरने दिलेल्या खोलीत एकत्र झोपायचे.त्या खोलीत एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. तक्रारदार तरुण आणि त्याचा नातेवाईक, जे नंतर आरोपी असल्याचं सिद्ध झालं, त्यांना सीसीटीव्ही सिस्टमचा पासवर्ड माहीत होता.
तक्रारदार तरुणाने पोलिसात धाव घेत एफआयआर दाखल केला. त्याचे आणि त्याच्या जोडीदाराचे शारीरिक संबंध ठेवत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज एका सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट केल्याचा आरोप तक्रारीत केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपी असलेल्या तक्रारदार तरुणाच्या नातेवाईकाला अटक केली. या गुन्ह्यातील आरोपीच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी नंतर बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.