देवनारहून निघालेली बकऱ्यांची गाडी कोल्हापुरात पकडली
हफ्तेखोर प्रतीक ननावरे आणि त्याचे साथीदार फरार
रवि निषाद/प्रतिनिधि
गोवंडी – देवनारहून बकऱ्या आणि मेंढ्या भरलेला ट्रक पशुप्रेमींनी पकडून कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणात फसवे पशुप्रेमी प्रतीक ननावरे आणि त्याच्या टोळीत सामील हफ्तेखोर फरार असल्याचे समजते. या हफ्तेखोरांच्या संरक्षणात हा ट्रक देवनारहून प्राण्यांना घेऊन कर्नाटकासाठी निघाला होता. प्राप्त माहितीनुसार, शनिवार, ६ ऑक्टोबर रोजी सर्व नियमांचे उल्लंघन करून हफ्तेखोर प्रतीक ननावरे आणि त्याच्या टोळीतल्या हफ्तेखोरांनी देवनार पशुवधगृहातून एका ट्रकमध्ये ५०० पेक्षा जास्त जनावरे जबरदस्तीने भरली होती. यासाठी हफ्तेखोरांनी व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम प्रोटेक्शन मनी म्हणून वसूल केली होती.
पोलिस सुत्रांनी सांगितले की,जसा शेर तसा सव्वाशेर या म्हणी प्रमाणे इथे हफ्तेखोरांना खरे पशुप्रेमी मिळाले आणि त्यांनी या टोळीच्या एका गाडीला कराड येथे पकडून पोलिसांच्या हवाली केले. परंतु, हफ्तेखोरांनी पोलिसांशी सेटिंग करून गाडी व जनावरे तिथून पळवून नेली. याची तक्रार उच्च पातळीवर करण्यात आली, त्यानंतर कराड पोलिसांनी पुन्हा त्या गाडी चालकाला बोलवून दंड भरून सोडले. नंतर हफ्तेखोरांनी गाडी पुन्हा कर्नाटकाच्या सीमारेषेजवळ नेण्याचा प्रयत्न केला, परंतु खऱ्या पशुप्रेमींनी ही गाडी पकडून कोल्हापूर पोलिसांच्या हवाली केली.
कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रमुख हफ्तेखोर प्रतीक ननावरे आणि त्याचे साथीदार यांनी प्रयत्न करून गाडी व जनावरे पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांच्या विशेष सुत्रांनी सांगितले की,या ट्रकमध्ये ५०० पेक्षा जास्त जनावरे आहेत, ज्यांची एकूण किंमत सुमारे ५५ लाख रुपये आहे. सध्या प्रतीक ननावरे आणि त्याचे साथीदार फरार असल्याचे समजते. ट्रक चालक आणि इतर व्यक्तींवर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हे प्रकरण खरे पशुप्रेमी आशीष बारिक आणि त्यांच्या पथकाने उघड केले आहे, ज्यामुळे हफ्तेखोरांच्या गोटात खळबळ माजली आहे.