सीबीडी पोलीस ठाणे कर्मचारी व पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू, पोलीस आयुक्तांकडून उद्घाटन

Spread the love

सीबीडी पोलीस ठाणे कर्मचारी व पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू, पोलीस आयुक्तांकडून उद्घाटन

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी काही करता येईल का या हेतूने गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल व वाहने हे आयुक्त स्तरावर केंद्रित केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन मधील बरीच जागा रिकामी झाली होती तसे मुद्देमाल ठेवलेल्या काही रूम सुद्धा रिकाम्या झाल्या होत्या. सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सदर जागेचा कल्पक रित्या उपयोग करून आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम असे उपक्रम सुरू केले होते. त्यानंतर आज त्यांनी मुद्देमाल ठेवलेल्या रूमचे रूपांतर पोलीस कर्मचारी व पाल्य यांच्याकरिता अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासिकेमध्ये केले आहे. सदर अभ्यासिकेचे उद्घघाट्न पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासकेमध्ये स्पर्धा परीक्षेची, व्यक्तिमत्व विकासाची, कायद्याच्या पुस्तकांसह आत्मचरित्रे, कथा कादंबऱ्या असे एकूण ३०० ते ३५० पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

वरिष्ठ पोलीस गिरीधर गोरे यांनी वर्षभरात पोलीस ठाण्याचा संपूर्ण चेहरा मोहारा बदलला असून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम गिरीधर गोरे यांनी सुरू केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. असेच उपक्रम इतर पोलीस ठाण्यांनीही राबवावेत असे मत आयुक्त मिलिंद भारांबे यांनी व्यक्त केले आहे. सदर कार्यक्रमावेळी सह पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon