धक्कादायक ! नाशिकमध्ये ९ वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर पती-पत्नीची आत्महत्या, पोलीसांकडून तपास सुरु

Spread the love

धक्कादायक ! नाशिकमध्ये ९ वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर पती-पत्नीची आत्महत्या, पोलीसांकडून तपास सुरु

योगेश पांडे/वार्ताहर

नाशिक – नाशिकमध्ये चिमुकल्या मुलीची हत्या करून त्यानंतर पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही, म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती असी की, विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गौळने गावचे असून ते पाथर्डी फाटा, सराफ नगर परिसरात राहत होते. त्यांनी मुलीला विष पाजलं, त्यानंतर पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केली.पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाने असं आहे. अवघ्या ९ वर्षांच्या मुलीला पती-पत्नीने विष पाजलं. त्यानंतर स्वत: जीवन संपवलं.

मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळफास घेतला. विजय सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच काल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन देखील घेतलं. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचा संशय आहे. शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली तेव्हा ती खाली आली नाही. त्यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद होता. आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा समोर पती-पत्नीने गळफास घेतला असल्याचं आढळून आलं. कुटुंबियांवर कोणतंही कर्ज नाही. तरीही आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम, सोनं हे सगळं होतं. मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon