बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी उकळणारे दोघे जेरबंद

Spread the love

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी उकळणारे दोघे जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – जळगावात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.अशीच एक घटना जळगाव परिसरात घडली आहे. जळगाव शहरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून सुमारे ५ लाखांची खंडणी घेणाऱ्या महिलेसह एका वकीलाला आयोध्या नगरात एमआयडीसी पोलीसांनी जर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेसह एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात ५५ वर्षीय व्यावसायिक हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. व्यावसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे ओळखीचे वकील उखा राठोड वय ३० रा. रामदेव वाडी यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेची ओळख निर्माण झाली. त्यानंतर व्यावसायिकाने महिलेच्या सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याच्या मोबदल्यात महिलेला वेळोवेळी पैसेही देण्यात आले. दरम्यान महिलेने दरवेळी व्यावसायिकाला काहीना काही कारणासाठी फोन करून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानुसार व्यावसायिकाने आतापर्यंत ७१ हजार ५०० आणि महिलेची ओळख करून देणारा वकील उखा राठोड याला १५ हजार रूपये दिलेले आहेत. त्यानंतर महिलेने पुन्हा फोन करून पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तिला समजविण्याचा प्रयत्न केला परंतू ती समजण्याच्या मानसिकेतेत नव्हती. त्यानंतर तीने ५ लाखांची मागणी केली. त्यावेळी व्यावसायिक यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने धमकी दिली, तू जर मला पैसे दिले नाही तर तुझ्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल तसेच माझी मुलीवर देखील बलात्काराचा केल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्याची धमकी दिली. सदर प्रकार घडल्यानंतर व्यावसायिक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सापळा रचून तिला १ लाख रूपयांची रोकड आणि ४ लाख रूपयाचे चेक घेतांना महिलेसह वकील राठोड याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता महिलेसह वकील राठोड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon