प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग आल्याने प्रियकराच्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू

Spread the love

प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग आल्याने प्रियकराच्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू

मुलाच्या मृत्यूचं कारण लपवण्यात आईनेही साथ देत रचला बनाव, बिबवेवाडी पोलीसांनी केला भंडाफोड

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – बॉयफ्रेण्डने विवाहित प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. चार वर्षांच्या चिमुरड्याने जेवणानंतर उलटी केल्यामुळे प्रियकराचा पारा चढला आणि त्याने मुलाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक म्हणजे मुलाच्या मृत्यूचं कारण लपवण्यात आईनेही साथ देत बनाव रचला. पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. विवाहित प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्यामुळे आरोपी प्रियकराने त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे. गुन्हा नाशिकला वर्ग करण्यात आला आहे.

आपला चार वर्षाचा चिमुरडा बेडवरुन खाली पडल्याने बेशुद्ध पडला, असा बनाव त्याची आई पल्लवीने केला होता. तिने पुण्याच्या मंगळवार पेठ भागातील कमला नेहरु रुग्णालयात मुलाला दाखल केले होते. मात्र शव विच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात समोर आले की, चार वर्षांच्या चिमुकल्याची आई पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडी परिसरात राहत होती. तिचे नाशिकच्या महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. रविवार १ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर मुलाने अचानक उलटी केली. त्यामुळे आरोपी प्रियकर महेश कुंभार चिडला. त्याने मुलाला हाता सोबतच झाडूनेही मारहाण केली होती. या वेळी चिमुकला बेशुद्ध पडला. मुलगा बेशुद्ध पडल्याचे पाहून त्याची आई घाबरली. त्यानंतर आधी तिने लेकाला नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. पुढे दोघांनी मुलाला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. मात्र बेडवरुन खाली पडल्यामुळे तो बेशुद्ध झाला, असा बनाव आईने रचला. परंतु उपचार सुरु असतानाच मुलाने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालाने त्यांचा भांडाफोड केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon