बीफ जवळ बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेत वृध्दाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस भरतीची तयारी करणारे तिघे ताब्यात

Spread the love

बीफ जवळ बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेत वृध्दाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस भरतीची तयारी करणारे तिघे ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – सोशल मिडियावरती काल दिवसभरात एक व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. रेल्वेमध्ये एका वृध्द व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये ४ -५ तरूण गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेत एका वृद्धाला मारहाण करत असल्याचा संतापजन व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ७२ वर्षीय वृद्ध गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यामुळे सहप्रवाशांनी वृद्धाला मारहाण केली, ही घटना २८ ऑगस्टला घडली. या प्रकरणाची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईहून धुळे – सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये २८ ऑगस्टला हा प्रकार घडला. जळगावमध्ये राहणारा वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणकडे जायला निघाला होता. नाशिक रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर वृद्धाचा बसण्याच्या जागेवरून तरूणांशी वाद झाला होता. या तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला, त्याचवेळी त्याच्या सामानाची तपासणी केली. यावेळी आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर तरूणांनी वृद्धाला मारहाण केली. यावेळी काही तरूणांनी या घटनेचे व्हिडीओ शेअर केला आता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे हे तिघेजण मुंबईला पोलीस भरतीसाठी जात होते. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणात रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवेंच्या आदेशानंतर सदर पीडित व्यक्तीला पोलिसांनी शोधलं. हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव आहे. हाजी अशरफ अली हे मुळचे चाळीसगावचे राहणारे असून २८ ऑगस्टला ते कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी येत होते. कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्यांना मारहाण केली. अशरफ अली यांना कल्याण रेल्वे स्थानकात या तरुणांनी उतरू दिले नाही. नंतर त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले.आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी तिघांची नावे आहेत. अटक केलेले तिघे तरुण हे मूळचे धुळ्याचे आहेत. त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon