लग्नाचं आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, नराधमाला अखेर खार पोलीसांनी लुधियानातून केली अटक

Spread the love

लग्नाचं आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, नराधमाला अखेर खार पोलीसांनी लुधियानातून केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – गेल्या काही दिवसांमध्ये महिला, तरूणी, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना मोठ्या प्रमाणात वाचा फुटत असून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्यांवर झालेला अत्याचार असो की कोल्हापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची झालेली हत्या…या सर्व घटनांनी महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून, बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ मविआकडून दोन दिवसांपूर्वीच निषेध आंदोलनही करण्यात आलं. या घटनांवरून राज्यात संतापाचे वातावरण असताना आता मुंबईतून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. लग्नाचे वचन देऊन, त्या बहाण्याने एका महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंजाबमधील लुधियाना येथून एका २६ वर्षांच्या तरूणाला रविवारी अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतील खार पोलिसांनी सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, आणि मुंबईत आणले. राजेश अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी राजेश या दोघांची दिल्लीतील एका प्रदर्शनादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या. आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर आरोपी राजेश याने गेल्या जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत महिलेवर अनेकदा बलात्कार केला. मात्र लग्नाचा विषय काढताच तो थातूरमातूर उत्तरं द्यायचा. आपील फसवणूक करून अत्याचार करण्यात आल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि तिने पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्या आधआरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असता, तो लुधियानामध्ये असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला लुधियाना येथून अटक करून मुंबईत आणले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon