नराधम बाप ! स्वताच्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी, नराधम बाप अटक

Spread the love

नराधम बाप ! स्वताच्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी, नराधम बाप अटक

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – नाशिकमध्ये गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नाशकात बापलेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. कपडे धुण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून जन्मदात्याने स्वतःच्या मुलीला शिवीगाळ व अंगलट करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित मुलगी ही अल्पवयीन असून, आरोपी हे तिचे वडील आहेत. पीडिता मुलगी ही (दि. २५) महाविद्यालयास सुटी असल्यामुळे घरी होती. ती कपडे धूत होती. त्यावेळी तिचे वडील दारू पिऊन घरी आले. त्यांनी पीडितेला कपडे धुण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून प्रथम शिवीगाळ व मारहाण केली. पीडितेने प्रतिकार केला असता त्यांनी तिच्याशी अंगलट करून तिला मिठी मारली व शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. असे केले नाही, तर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर भेदरलेल्या मुलीने कंपनीत कामाला गेलेल्या आईला फोन करून घरी बोलावून घेत झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने तिच्या आईसह अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत जन्मदात्याविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon