शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या विरोधात ऍट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
बदलापूर – बदलापुरात साडेतीन वर्षीय दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात जमावाने मंगळवारी आंदोलन केले. आंदोलकांनी तब्बल १० तास रेल रोको करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. एकीकडे संपूर्ण जनता चिमुरडींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती तर, शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना अर्वाच्च भाषा वापरली होती. याप्रकरणी आता त्यांच्यावर ऍट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जनतेचा उद्रेक झाला होता. यावेळी एका महिला वृत्तप्रतिनिधीला अर्वाच्य भाषेत शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवीगाळ करत तिचा अपमान केला होता. या घटनेनंतर वामन म्हात्रे यांच्याविरोधात जनतेने संताप व्यक्त केला होता. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेर जनतेचा रेटा आणि शिवसेना (उबाठा) यांच्या दणक्यानंतर म्हात्रे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.