साकीनाका परिसरात नववीतील १६ वर्षीय मुलाचा ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, मुलाने आपल्या गुन्ह्याची दिली कबुली.
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली आहे. अशातच आता मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका १६ वर्षीय मुलाने ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. घटना साकीनाका भागात घडली. पीडित मुलीची आवश्यक आरोग्य तपासणी राजवाडी हॉस्पिटलमध्ये सुरू असून तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १६ वर्षीय मुलाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत आहे. पीडित मुलीचं कुटुंब साधारण १५ दिवसांपूर्वी सोलापूरमधून मुंबईत आलं आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.साकीनाका पोलीसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.