धक्कादायक ! नराधमाचा शिक्षकी पेशाला कलंक, ट्युशन सेंटरवर बोलावून विद्यार्थिनीवर अत्याचार!
पोलीस महानगर नेटवर्क
वसई – महाराष्ट्राला गुरू-शिष्य परंपरा लाभलेली आहे, परंतु पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर खाजगी शिकवणी वर्गात अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या शिक्षकाला अटक केली आहे. अमित दुबे (३०) असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, “हा गुन्हा यावर्षी मार्च ते जुलै दरम्यान घडला. आरोपीने पीडितेला कोणत्या तरी बहाण्याने त्याच्या घरी शिकवणी केंद्रात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे दिसून येत आहे.सदर आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्यानुसार, दुबेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ६४ (२) (एफ) आणि कलम ६५ (१) गुन्हा दाखल असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.