बदलापूरमध्ये हैदोस घालणाऱ्या ‘चादर गँग’चा पर्दाफाश,१७ लाखांचा मुद्देमालासह तिघांना अटक 

Spread the love

बदलापूरमध्ये हैदोस घालणाऱ्या ‘चादर गँग’चा पर्दाफाश,१७ लाखांचा मुद्देमालासह तिघांना अटक 

योगेश पांडे / वार्ताहर 

बदलापूर – बदलापूरमधील घोरपडे चौकातल्या टायटनच्या शोरुममधून सुमारे ६०० घड्याळांची चोरी झाली होती. या महागड्या घड्याळांची किंमत लाखोंच्या घरात होती. या घटनेमुळे बदलापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसंच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. बदलापूर पोलिसांना अखेर ही चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश करण्यात यश मिळालं आहे. बदलापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक या चोरांचा तपास करत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणात चादर गँग सहभागी असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणातील काही आरोपी बिहारमध्ये पळून गेले होते. त्यानंतर बदलापुर पोलिसांनी बिहार गाठत काही आरोपींना बेड्या ठोकल्या, तर काहींना मुंबईतून अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यामध्ये एकूण ७ आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर चार आरोपी फरार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान अटक असलेल्या या तीन तिन्ही चोरांकडून ४०६ घड्याळं आणि ६४ मोबाईल असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे, तर या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच फरार आरोपी आणि उर्वरित मुद्देमाल पकडला जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी सुरेश वराडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon