६० वर्षीय काकाचा पुतणीवर बलात्कार;आरोपीच्या प्रेयसीकडून घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी शहरात १५ वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शांती नगर पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तसेच आरोपीच्या प्रेयसीविरोधातही या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भाजीचे दुकान चालवणारी ही मुलगी आरोपीच्या घरी भाजी पोहचवण्यासाठी गेली असता ही घटना घडली. याप्रकरणी शांति नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रेमसंबंध होते आणि तो तिच्यासोबत भिवंडीत राहत होता. आरोपी हा रिक्षाचालक असून शांती नगर परिसरात भाजीचे दुकान चालवणारे फिर्यादी हे आरोपीचे नातेवाईक आहेत. पीडित अनेकदा आरोपीच्या घरी भाजी पोहचवण्यासाठी जात असे. जून महिन्यात मुलगी भाजी देण्यासाठी एकटीच त्याच्या घरी गेली असता आरोपीच्या प्रेयसीने तिला कपडे काढायला लावले आणि त्यानंतर आरोपीने प्रेयसीसमोर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर आरोपीच्या प्रेयसीने हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. त्यानंतर पीडिता धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. नुकतीच पीडित मुलगी पुन्हा त्याच्या घरी गेली असता तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार करण्यात आला. घरी परतल्यावर पीडितेसोबत काही तरी चुकीचे घडले, असे तिच्या मावशीला संशय आला. तिने पीडिताला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पीडिताच्याा मावशीने शांती नगर पोलीस गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (J), ३७६ (२) (N), ३६६ (ए), ३४१, ५०६ आणि ३४ तसेच बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४, ८, १० आणि १२ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ आणि ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, गुरुवारी आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, आरोपीची महिला साथीदार अद्याप फरार असून पोलिस सध्या तिचा शोध घेत आहेत.