पिंपरीत प्रेमप्रकरणातून प्रियकराकडून प्रेयशीची भर रस्त्यात हत्या, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Spread the love

पिंपरीत प्रेमप्रकरणातून प्रियकराकडून प्रेयशीची भर रस्त्यात हत्या, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – नवी मुंबईच्याउरण येथील हत्या प्रकरणानंतर पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून २१ वर्षीय तरुणाने भर रस्त्यात चाकूने सापाचा वार करून तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर घटनास्थळावरून दुचाकी वर पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राची विजय माने – २१ असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून अविराज खरात असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सांगली जिल्ह्यातले राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची आणि अविराज हे मूळचे सांगली जिल्ह्यात राहणारे होते. सांगलीच्या महाविद्यालयात ते एकत्र शिकत होते. तिथेच त्यांच्यांच प्रेम संबंध जुळले. यासंदर्भात अविराजाने प्राचीसोबत लग्न करण्याची इच्छा तिच्या घरच्यांसमोर बोलून दाखवली होती. अविराजने तशी मागणी देखील घातली होती. तेव्हा प्राचीच्या कुटुंबियांनी या गोष्टीला नकार दिला होता. मात्र, अविराजचं प्राचीवर प्रेम होतं. प्राचीच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता.

यानंतर प्राची नोकरीसाठी पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात आली होती. सहा महिन्यांपासून ती चाकण एमआयडीसीमध्ये काम करत होती. त्यावेळी अविराज त्या ठिकाणी आला आणि तिला आपण लग्न करू, असे सांगितलं. या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी अविराजच्या रागाचा पारा चढला. त्याने कुठलाही विचार न करता सोबत आणलेल्या चाकूने प्राचीवर सपासप वार केले. या हल्ल्यात प्राचीन जखमी होऊन जागेवरच कोसळली. या घटनेसंदर्भात माळुंगे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी अविराज पळून जात असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी बारा तासा आत सूत्र हलवत पुणे-बंगळुरु हायवे लगत असणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या परिसरातून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चाकण एमआयडीसी परिसर हादरून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon