संपत्तीसाठी पोटच्या मुलानेच केली जन्मदात्याची हत्या, शर्टवरील टेलरच्या नावामुळे सहा दिवसांनी गुन्ह्याची उकल

Spread the love

संपत्तीसाठी पोटच्या मुलानेच केली जन्मदात्याची हत्या, शर्टवरील टेलरच्या नावामुळे सहा दिवसांनी गुन्ह्याची उकल

योगेश पांडे / वार्ताहर 

बुलढाणा – ज्या बापाने आपल्या लेकाला लहानाचा मोठा केला, त्याच मुलाने प्रॉपर्टीसाठी जन्मदात्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणामुळे संग्रामपूरमध्ये एकच खळबळ माजली आहे. सहा दिवसांपूर्वी वान नदीपात्रात अर्धवट रोवून ठेवलेल्या प्रेताची ओळख अखेर पटली असून मृतक अशोक विष्णू मिसाळ (५५) असं त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती आहे. अशोक मिसाळ हे दानापूर येथील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालं आहे. तर त्यांच्याच मुलाले संपत्तीसाठी त्यांची हत्या केल्याचं पोलिसांनी समोर आणलं आहे. मित्राच्या सहाय्याने या मुलाने अशोक मिसाळ यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सहा दिवसांत पोलिसांनी या गुंतागुंतीच्या अशा गुन्ह्याची उकल करत आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी काटेल कोलद येथील नदीपात्रात एक अर्धवट रोवून ठेवलेले प्रेत आढळून आले होते. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा त्याच गावातील फोटोग्राफर संतोष थोरात यांनी तामगाव पोलिसांना दिली. कुजलेल्या प्रेताचा जागेवरच पंचनामा करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांच्या हाती कुठलाच सुगावा लागत नव्हता. ना कुठलं ओळखपत्र नाही कुठली खूण त्यामुळे मृताची ओळख पटवणे फारच कठीण झाले होते. मात्र, मृता शरिरावर जे शर्ट होतं, त्या शर्टावर दानापूर येथील टेलरच्या नावाची पट्टी होती. जेव्हा पोलिसांनी या टेलरकडे जाऊन चौकशी केली, तेव्हा त्या टेलरने मृतदेहाची ओळख पटवली आणि तपासाला गती मिळाली. तपासादरम्यान पोलिसांनी अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ (२४) आणि मित्र राहुल रामदास दाते (२५) या दोघांना चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा या दोघांनीही हत्येची कबुली दिली आणि या घटनेचा छडा लागला.

मृतक अशोक मिसाळ हे गेल्या २० वर्षांपासून एकटेच दानापूर येथे राहत होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगा हे जामोद येथे राहत होते. शेती आणि इतर प्रॉपर्टी नावाने करून देण्यासाठी या बाप लेकामध्ये नेहमी वाद होत होते. १३ जुलैला आरोपी प्रवीण उर्फ शुभम रात्री दानापूर येथे वडिलांकडे आला होता. त्यानंतर त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून अशोक यांची हत्या केली. तपासादरम्यान वडील पंढरपूरच्या वारीला गेले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं. मात्र, कसून चौकशी करताच त्याने सारं खरं खरं सांगितलं. यावरुन या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास मगाव ठाणेदार राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे, जीवन सोनवणे, सहाय्यक फौजदार रामकिसन माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक वावगे, प्रमोद मुळे, विकास गव्हाड, संतोष मेहंगे, संतोष पाखरे, चालक वावगे सेवानंद हिवाळे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon