आंतर जिल्हा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडुन अटक

Spread the love

आंतर जिल्हा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडुन अटक

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर – घरात कोणीही नसल्याचा फायदा घेवुन घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार कुसूम मिश्रा यांनी दिली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापुर शहर गु.र.नं. ४४६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणुन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सपोनि विजय पाटील व त्यांचे पथक यांना दि.२० जुलै, २०२४ रोजी खात्रीशिर बातमी मिळाली की, एक इसम हा चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मार्केट यार्ड पुढे असलेल्या जनावरांच्या दवाखान्यासमोर, हैद्राबाद रोड, सोलापुर येथे थांबला असल्याबाबत बातमी मिळाली. सदर बातमीची शहानिशा करुन कारवाई करण्यासाठी सदर ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन सोन्याच्या बांगडया, सोन्याची चैन व तीन अंगठया असे एकुण ५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण १,७१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. सदर घरफोडी करणारा आरोपी सुखदेव ऊर्फ बंडू हणमंत नाईक, वय २६ वर्ष, रा.मु. खोराडी वस्ती, पोस्ट- आरग, ता. मिरज, जि. सांगली यास ताब्यात घेण्यात आले आले.

सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ दिपाली काळे, पोलीस उप- आयुक्त गुन्हे, राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विजय पाटील व पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, घिरज सातपुते, विठठल यलमार, प्रविण शेळकंदे, वसिम शेख, शांतीसागर जेनुरे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon