यावल तालुका होमगार्ड समादेशकपदी विजय जावरे यांची नियुक्ती
सुरेश पाटील/यावल
यावल – जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये यावल तालुका समादेशकपदी विजय जावरे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या या नियुक्ती बद्दल होमगार्ड पथकाने तसेच यावल पोलीस दलाने अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव यावल तालुका प्रभारी समादेशक अधिकारी भानुदास कवडिवाले सं.क्र. ११६६ हे वयानुसार होमगार्ड सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा समादेशक अधिकारी तथा अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये यावल तालुका समादेशक अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या जागी सं. क्र. ११९८ अंशकालीन लिपिक विजय जावरे यांची तालुका समादेशक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नुतन तालुका समादेशक अधिकारी हे तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे.दि. १८ जुलै २०२४ रोजी याबाबतचे आदेश काढण्यात आले. रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी यावल येथे सेवानिवृत्त तालुका समादेशक अधिकारी यांच्या सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी नुतन यावल तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी माजी तालुका समादेशक अधिकारी भगतसिंग पाटिल, माजी कंपनी कमांडर शशिकांत फेगडे, माजी पलटण नायक रमेश चौधरी,
अरुण काळे, शिवराम येऊल यांच्यासह यावल तालुक्यातील होमगार्ड उपस्थित होते.