नीट पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात, राज्यातील दोन शिक्षक एटीएसच्या ताब्यात

Spread the love

नीट पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात, राज्यातील दोन शिक्षक एटीएसच्या ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – देशभरात गाजत असलेल्या नीटचे (नॅशनल टेस्टींग एजन्सी) धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहचले आहे. या प्रकरणात वेगाने घडामोडी सुरु झाल्या आहेत. केंद्र सरकारने नीट परीक्षा २०२४ मधील गैरव्यवहाराचा तपास सीबीआय कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. नीटचे महासंचालक सुबोधकुमार सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात आले आहे. या प्रकरणात लातूर खासगी कोचिंग क्लासमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या दोन शिक्षकांना एटीएसच्या पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. संजय जाधव आणि जलील पठाण असं या दोन शिक्षकांचे नाव आहेत. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातल्या बोथी येथील रहिवाशी आहेत तर सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक आहेत. तर जलील पठाण हे लातूर जवळच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळॆत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवितात.

लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात. याचाच गैरफायदा घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूरमध्ये चालत असावे, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे आता ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांकडून काही माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एटीएसच्या पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापा टाकत या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. बिहार पोलिसांनी नीट प्रकरणात झारखंडमधील सहा जणांना अटक केली आहे. झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील सहा जणांची पोलिसांनी चौकशी सुरु केले. आरोपी झुनू सिंग यांच्या घरी राहत होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये परमजीत सिंग, प्रशांत कुमार, अजित कुमार, राजीव कुमार, पंकू कुमार यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon