मनमाडच्या युनियन बँकेच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या एजंटकडून ७६ लाखांचा चुना, मुख्य आरोपी संदीप देशमुखवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – मनमाड युनिअन बँकेची सिस्टर कन्सर्न असलेली स्टार – युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स धारकांची बनावट सर्टिफिकेट्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नुकताच मनमाडला युनियन बँकेच्या मुदत ठेव प्रकरणी करोडो रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता स्टार युनियन डाय इन्शुरन्स कंपनीची ७६ लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी विमा कर्मचारी संदीप देशमुख याच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात या कंपनीने तक्रार दाखल केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आरोपी संदीप देशमुख देशमुख हाच मुख्य आर- युनिअन बँकेच्या भ्रश्टाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याच फसवणूक प्रकरणी सध्या तो १४ दिवसांची पोलिस कष्टडी भोगून एम.सी. आर मध्ये गेला आहे. ही कंपनी युनियन बँकेशी संलग्न विमा कंपनी असल्याने संशयित संदीप देशमुख याने परिसरातील जवळपास १८ विमा धारकांची विमा पॉलिसी काढून विम्याची ७६ लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडे जमा केली नसल्याचा आरोप विमा कंपनी प्रशासनाने केला आहे.
या गंभीर प्रकरणाबाबत शनिवारी विमा कंपनी अधिकारी सोहेल शेख यांनी या आधी एफ. डी. बोगस पावत्याच्या युनियन बँक अपहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप देशमुख विरोधातच तक्रार दिली आहे. या नव्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रकरणामुळे आता युनियन बँक खातेदारांबरोबरच या बँकेची विमा पॉलिसी काढणाऱ्या खातेदारांचेही धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व गैरप्रकार संदीप देशमुख हा बँकेच्या कार्यालयात टेबलवर बसून करायचा यामुळे खातेदारांना विश्वास वाटायचा.पोलीस याप्रकरणी पुन्हा एकदा संपूर्ण चौकशी करीत आहेत.