अरेरे ! आता तर चोरट्यांचा पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशातच हात, मोबाईल लंपास करून लाखों रुपयांना गंडा; गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – चोरटे अनेकदा सर्वसामांन्यांच्या चीजवस्तू, मोबाइल, पाकीट लंपास केल्याचे प्रकार घडत असतानाच आता थेट चोरट्यांनी पोलीसाच्या खिशातच हात घातला आहे. कारण, एका पोलिस कर्मचाऱ्यालाच आठवडे बाजारात भाजी खरेदी करणे महागात पडले असून चोरट्यांनी पोलिसाचा मोबाइल लंपास करुन त्यातील ‘यूपीआय’द्वारे ९९ हजार दुसऱ्या बँक खात्यात वळते करीत ९६० रुपयांची खरेदी सुद्धा केल्याची बाब समोर आली आहे. १ लाख ९ हजार ९६० रुपयांची फसवणूक झाल्याने पीडित पोलिसाने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीसह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगार नवनवीन फंडे आजमावत अडून आता हा नवीन फंडे समोर येत आहे. गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरुन त्यातील अँपद्वारे बँकांचे व्यवहारही केल्याने धक्कादायक बाब उघड झाली आहे. आश्चर्य म्हणजे, चोरट्यांनी पोलिस कर्मचाऱ्यालाच गंडविल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, देवळाली कॅम्प पोलिस वसाहतीतील रहिवाशी दिपक सखाराम सरकटे (वय ३८) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला खरेदी करीत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांचा दहा हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास ‘यूपीआय’द्वारे कोलकाता येथील स्टेट बँकेच्या एका खात्यात ९९ हजार रुपये संशयिताने वळते केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ९६० रुपये ऑनलाइन खर्च केले. हा प्रकार लक्षात येताच सरकटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकांकडे तपास देण्यात आला आहे.
पोलीस ऍक्शन मोडवर दरम्यान, चोरटे हे फिर्यादीच्या परिचयातील होते का, संशयितांना फिर्यादींच्या मोबाइलचा पासवर्ड, बँक ॲपचा पासवर्ड, यूपीआयचा पासवर्ड कसा ठाउक, नेमके कोलकाता येथील बँकेतच पैसे का पाठविले, ऑनलाइन खरेदी नेमकी कोणत्या वस्तूंची केली यासंदर्भात देवळाली कॅम्प पोलिस तपास आता ऍक्शन मोडवर आले आहेत.