धक्कादायक ! धुळ्यात १४ वर्षांच्या मुलासोबत किळवाणं कृत्य, मस्करी करता करता गेला जीव, दोघांवर गुन्हा दाखल

Spread the love

धक्कादायक ! धुळ्यात १४ वर्षांच्या मुलासोबत किळवाणं कृत्य, मस्करी करता करता गेला जीव, दोघांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

धुळे – एखाद्याची मस्करी किती जीवावर बेतू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणून या घटनेकडे पहाता येईल. धुळ्यातील या धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणं दोघांना चांगलंच महाग पडलं आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने यात १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. लळींग शिवारातील पंचरच्या दुकानात ही घटना घडली. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईक मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (वय १४) वर्ष हा देखील काम करत होता. त्यांच्या दुकानाशेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात. शेजारीच दुकान असल्याने खालीक हा त्यांना चांगला ओळखत होता. सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचं दुकान उघडं होतं. मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे खालीक हा दुकानात एकटा होता. यावेळी शिवाजी सुळे व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली.

मोहम्मद खालीकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होवू लागला. त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी खालिकला आयसीयुमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी आतड्यांना व नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचं सांगितलं. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon