धक्कादायक ! मुलगी व जावयाकडून वृद्ध आई-वडिलांची नऊ कोटींची फसवणूक; फ्लॅट व रक्कमेचा समावेश
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ९० वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या जन्मदात्याना त्यांची मुलगी व मुलासमान असलेल्या जावई व दोन नातवंडांनी मिळून ९.३७ कोटी रुपयांची फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्धाच्या तक्रारीच्या आधारे कासार वडवली पोलिस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत आरोपीने पीडितेला त्यांच्यासोबत राहायला घेऊन गेले व लाडीलबाडीने त्याचे १३ फ्लॅट हस्तांतरित करून विकले व त्यातून त्यांना ५.८८ कोटी रुपये मिळाले तसेच एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेच्या बँक खात्यातून ३ कोटी रुपये व पत्नीचे ४९ लाख रुपये किमतीचे दागिने देखील आरोपींनी काढून घेतले. वृद्ध जोडप्याने याबाबत विचारणा केली असता “पीडित आणि त्याच्या पत्नीला आरोपींनी त्यांना धमकावले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली,” याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.