पिंपरीत ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटकेत; दोन फरार

Spread the love

पिंपरीत ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटकेत; दोन फरार

पोलीस महानगर नेटवर्क

पिंपरी – राज्यात सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठया प्रमाणात सुरू आहेत. टास्क देणे, शेअर्स मार्केट, दामदुप्पट रक्कम यासारख्या योजना ऑनलाईन दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. असाच एक पिंपरी परिसरात घडली आहे. गरजूंची ऑनलाईन टास्क देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणार्‍या एका टोळीला बेड्या ठोकण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेला यश आले आहे. मात्र, या टोळीचे २ सूत्रधार पसार झाले आहेत. या टोळीने आजवर अनेकजणांना गंडा घातला असून हा आकडा २० कोटी रुपयांवर असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

अल्ताफ मेहबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्ण भगवान खेडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून या टोळीचे सूत्रधार किरण खेडेकर आणि हाफिज शेख हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. ही टोळी व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम सारख्यासोशल मीडियावर ऑनलाईन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष गरजूंना दाखवत असे. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे दाखवून पैसे उकळले जात असत. त्यांना मोबदला अथवा त्यांनी दिलेले पैसे परत मिळत नसत. त्यावेळी आपले फसवणूक झाली हे त्या गरजूंच्या लक्षात येत असे.

या प्रकरणात पोलीस आपणापर्यंत सहजासहजी पोहोचू नयेत म्हणून आरोपींनी अनेक गरीब, गरजू नागरिकांची खाती त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन उघडली. या खात्यावर पैसे स्वीकारले. खात्यावर उलाढाल करू देण्यासाठी आरोपी खातेधारकांना दरमहा २ ते ५ हजार रुपये देत होते. पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon