पिंपरीत वकीलाला कोयत्यानं आतडे बाहेर काढून ठार मारण्याची धमकी
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – माझ्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करतो काय म्हणत शस्त्राचा धाक दाखवून वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
प्रज्वल उर्फ राहुल कमलेश दुबे (३०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १२) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम कांबळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्राणीमित्र असून वकील देखील आहेत. आरोपीने फिर्यादी यांना शस्त्र असल्याचा धाक दाखवून १० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी फिर्यादी यांनी पैसे नसल्याचे सांगितले असता आरोपीने धमकी देऊन साथीदार दिपक मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल का केला म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच माझ्या विरोधात तक्रार दिली तर मी जेलमधून बाहेर आल्यावर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.