पुण्य आणि स्वर्गाचे आमिष दाखवून डॉक्टरची ५ कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक

Spread the love

पुण्य आणि स्वर्गाचे आमिष दाखवून डॉक्टरची ५ कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक

स्वर्गाचा खेळ पडला डॉक्टरला महागात; कोंढवा पोलीस गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात काही ना काही घटना घडत असतात. अशीच एक घटना सुशिक्षित असलेल्या डॉक्टरच्या जीवनात घडली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी वेळोवेळी गोड बोलून प्रभावित झाले. त्यांना मेरिट मिळवून स्वर्ग मिळवण्यासाठी प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याची बिस्किटे असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. अशाप्रकारे या डॉक्टरची ५ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या ४२०, ४०६, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सादिक अब्दुलमजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एतेशाम सादिक शेख, अममार सादिक शेख (सर्व हार्मनी सोसायटी, कोंढवा-बिबवेवाडी रोड, गुलटेकडी), राज आढाव उर्फ नरसू अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डॉ.अहमद अली इनाम अली कुरेशी (वय ६७, रा. मेफेअर एलिगंझा, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. आरोपी सादिक शेख याची पत्नी यास्मिन मुले एतेशाम व अम्मार यांनी फिर्यादी यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांच्यसोबत वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून त्यांना प्रभावित केले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवले तसेच वेळोवेळी फिर्यीदी यांच्या मालमत्तेचे ११ बक्षीसपत्र स्वत:च्या नावावर करुन घेतले तसेच फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याची बिस्किटे इत्यादी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उकळली. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची ५ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सर्व मालमत्ता परत मागितली. मात्र आरोपींनी मालमत्ता परत देण्यास नकार देऊन फिर्यादी यांची कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon