गुवाहाटीत एअर होस्टेसचा विनयभंग कोणी केला? शिंदे गटाच्या आमदारांवर निर्भय बनो कार्यक्रमात ऍड.सरोदे यांचा सनसनाटी आरोप

Spread the love

गुवाहाटीत एअर होस्टेसचा विनयभंग कोणी केला? शिंदे गटाच्या आमदारांवर निर्भय बनो कार्यक्रमात ऍड.सरोदे यांचा सनसनाटी आरोप

धाराशिव – एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत गुवाहाटी गाठली होती. मात्र याच गुवाहाटीच्या हॉटेल मध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे. धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना सरोदे यांनी हा आरोप केला आहे. तसेच एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला?? असा सवाल करत सरोदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना ऍड असीम सरोदे म्हणाले की, “गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यावर २ आमदाराना मारहाण करण्यात आली होती. तसेच, स्पाईस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेस यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये इतर लोकांना प्रवेश नव्हता, दारूच्या नशेत झिंग होऊन हे सगळे तिथे गेले होते असेही सरोदे म्हणाले आहेत.

सरोदे यांनी थेट कोणत्याही आमदाराचा उल्लेख न करता लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार सत्तासंघर्षादरम्यान जेव्हा या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते तेव्हाचा उल्लेख करत सरोदेंनी हा दावा केला आहे. “गुवाहाटीमधील ज्या हॉटेलमध्ये हे सगळे (शिंदे गटाचे बंडखोर आमदार) थांहलेले तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. मात्र ‘स्पाईस जेट’ आणि ‘इंडिगो’ या २ विमान कंपन्यांसाठी काही खोल्या आधीपासूनच बूक होत्या. त्या हॉटेलबरोबर त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. त्यांचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? हे सर्व महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. दारुच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही,” असं सरोदे आपल्या भाषणात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon