शिक्षणाचे माहेरघर होतेय ‘उडता पुणे’? ४ कोटी रुपयांची अमली पदार्थ जप्त
पुणे – पुण्यात तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे. ३ ड्रग्स तस्करांना अटक करत पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार रुजू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईची समजली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला ड्रग्ज तस्करांनी विळखा घातल्याचे दिसत आहे. परराज्यातून येणारे लोक, राज्यातील तसेच देशातील विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शहरात लक्षणीय आहे. यामुळे तरूण मुलेही ड्रग्जच्या आहारी जात आहेत.