वर्ध्यात नरबळीचा प्रयत्न फसला, महिलेवर गुन्हा दाखल
वर्धा – एका बारा वर्षीय बालकाला शेजारी राहणाऱ्या महिलेने विहिरीवर नेत नरबळी देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नलवाडी परिसरात घडला, पण बालकाने समयसूचकता दाखवत विहिरीत असलेल्या दोरीला पकडत हिंमतीने तो विहिरीच्या बाहेर आल्याने त्याचे प्राण वाचले. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी सखोल चौकशी करत नरबळी व इतर अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये महिलेवर गुन्हा नाेंदविला आहे.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वर्धा येथील नलवाडी परिसरातील नागसेन नगर येथील सर्वेश पुरषोत्तम गाटेकर हा बारा वर्षीय चिमुकला मागील दोन वर्षांपासून आपल्या मामा व आजीसोबत राहतो. सर्वेश घराजवळ पतंग उडवत असतांना घरासमोरीलच शारदा वरके या महिलेने त्याला काम पाहण्याच्या बहाण्याने नागसेन नगर येथील रोडच्या बाजूला असलेल्या विहिरी जवळ नेले.या ठिकाणी महिलेने बालकाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. त्यानंतर विहिरीत फुल टाकायला लावले. तसेच पाच दगडं विहिरीत टाकायला सांगितली. पाचवा दगड विहिरीत टाकताच महिलेने सर्वेशला विहिरीत ढकलले. त्यानंतर ती तेथून निघून गेली.
सर्वेशचे धाडस
दरम्यान महिलेने सर्वेशला ज्या विहिरीत ढकलले होते ती विहीर जवळपास ४० फूट खोल आहे. त्यात २६ फूट पाणी होते. सर्वेशने विहिरीत पडताच समयसूचकता दाखवत विहिरीत मोटार लावण्यासाठी असलेल्या जुन्या पाट्याला पकडले. त्या पाट्याचा आधार घेत ताे विहिरीच्या बाहेर सुखरूप आला. नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले होते. १२ वर्षांच्या मुलाला तिने विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला शारदा हिने लगेच विहिरीत ढकलले. त्यांतर तिने तेथून पळ काढला. मुलाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत विहिरीच्या वर आला आणि आपले प्राण वाचवले. घरी पोहचल्यानंतर बालकाने आई वडिलांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शारदा हिचा शोध घेत आहेत.