कल्याण बस आगारात आरपीएफ जवानाच्या पत्नीचे ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास
कल्याण – कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. कधी रेल्वे स्टेशन तर कधी बस आगार या ठिकाणी चोरटे नेहमीच प्रवाशांना लक्ष करीत असतात. पोलिसांनी कारवाई करून देखील चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही, उलट दिवसेंदिवस चोरटे नवनवीन शकल लढवून प्रवाशांना लुटत आहेत. अशीच एक घटना नुकतीच कल्याण पश्चिम परिसरातील बस आगारामध्ये घडली.
आरपीएफ कार्यरत असणारे जवान त्यांची पत्नी सारिका शिंदे या आपल्या गावी जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या मुलीकडे असणारी ७ तोळे सोन्याची बॅग चोरट्याने बॅगेची चैन खोलून सोन्याचे दागिने लंपास केले. मुलीला आपल्याजवळील बॅग वजनाने हलकी वाटल्याने तिने बॅगेत पाहिले असता आपले दागिने चोरी झाल्याचे दिसून आहे.सदर बस बराच वेळ थांबून तपासनी केली असता कुणीच सापडले नाही.चोरट्याने आपले काम फत्ते करून तिथून पळ काढला. सोन्याचे दागिने चोरी झाल्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.