भाजप कार्यकर्त्याची उत्तर प्रदेशात गोळ्या झाडून हत्या, आरोपीला भिवंडीतून अटक

Spread the love

भाजप कार्यकर्त्याची उत्तर प्रदेशात गोळ्या झाडून हत्या, आरोपीला भिवंडीतून अटक

योगेश पांडे – वार्ताहर 

भिवंडी – उत्तर प्रदेशात भाजप कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. मुंबईतील भिवंडीतून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या हत्या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकर्ता आणि पत्रकाराची गोळी मारुन हत्या केली होती. ⁠गोळी मारणाऱ्या आरोपीला भिवंडीतून अटक केलीय. आशुतोष श्रीवास्तव याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शहागंज पोलिस स्टेशन, जिल्हा जौनपुर येथे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जमरुद्दीन हानिफ कुरेशी याला भिवंडीतून अटक झालीय. ⁠भिवंडी क्राईम ब्रांच आणि शहागंज पोलीसांनी संयुक्त कारवाई केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आशुतोष श्रीवास्तव हे भाजपचे नेते असून ते पत्रकारसुद्धा आहेत. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मोठा खुलासा झाला असून मंगळवारी रात्री सूत्रधाराला अटक झालीय. पोलिसांनी जमीरुद्धीन कुरैशी याला अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या सहकाऱ्याने सूत्रधार आणि मुख्य आरोपी असलेल्या जमीरुद्दीनला ताब्यात घेतलं गेलं. त्याच्यावर १६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. जौनपूरमधील सबरहद गावात आशुतोष श्रीवास्तव हे भाजप कार्यकर्ता होते. १३ मे रोजी प्रचारासाठी जाताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. यात श्रीवास्तव यांना चार गोळ्या लागल्या. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेलं पण तिथं उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon